घोडेगावात कांदा आवकेत वाढ

घोडेगावात कांदा आवकेत वाढ

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) काल बुधवारी कांद्याच्या आवकेत (Onion Inward) 8 हजार गोण्यांनी वाढ झाली तर भावात 100 रुपयांची घसरण झाली.

काल बुधवारी 295 वाहनांतून 54 हजार 620 गोण्या कांदा लिलावासाठी (Onion Auction) आला होता. सोमवारच्या तुलनेत ही आवक जवळपास 8 हजार गोण्यांनी अधिक होती. भाव जास्तीत जास्त 3500 रुपयांपर्यंत निघाले असून सोमवारच्या तुलनेत भाव 100 रुपयांनी घसरले.

मोठ्या मालाला 3200 ते 3300 रुपये भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 3000 ते 3200 रुपये, गोल्टी कांद्याला (Onion) 1900 ते 2000 रुपये, गोल्टा कांद्याला 2100 ते 2200 रुपये तर जोड कांद्याला 400 ते 500 रुपये भाव मिळाला. एक-दोन वक्कलांना 3400 ते 3500 रुपये इतका भाव मिळाला. नवीन मालाला 500 ते 2800 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com