घोडेगावात कांद्याला वर्षातील उच्चांकी भाव

घोडेगावात कांद्याला वर्षातील उच्चांकी भाव

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) मंगळवारी 5 हजार 300 रुपये इतका उच्चांकी भाव (High Prices) मिळाला. 2021 या वर्षातील हा आतापर्यंतचा उच्चांकी भाव आहे.

कांद्याची (Onion) एकूण 33 हजार 144 गोण्या (18 हजार 565 क्विंटल) इतकी आवक झाली. मोठ्या मालाला 3800 ते 4000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 3400 ते 3500 रुपये, मध्यम मालाला 3200 ते 3400 रुपये, गोल्टी कांद्याला (Onion) 2900 ते 3500 रुपये, जोड कांद्याला 600 ते 700 रुपये भाव मिळाला. तीन ते चार वक्कलांना 5100 ते 5300 रुपये इतका भाव मिंळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com