घोड नदीत वाळू उपसा; 10 बोटी नष्ट

घोड नदीत वाळू उपसा; 10 बोटी नष्ट

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील म्हसे, माठ, माळवाडी, खेडकर वस्ती भागांतील घोड नदी पात्रात महसूल आणि बेलवंडी पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणार्‍या कोट्यवधी रुपये किंमतीच्या 10 यांत्रिक फायबर बोटी आणि सेक्शन बोटी जप्त करून जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या आहेत.

श्रीगोंदा तहसीलदार प्रदिप पवार आणि बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार म्हसे, माठ, माळवाडी, खेडकर वस्ती येथील घोडनदी पात्रात काही व्यक्ती यांत्रिक फायबर बोटीच्या सह्याने विनापरवाना अवैध वाळुचा उपसा करीत आहेत. त्यावरुन त्यांनी स्वतः मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावुन खात्री करुन या ठिकाणी छापा टाकत फायबर बोटी व सेक्शन बोटीने अवैधरित्या वाळूचा उपसा करत असताना मिळुन आल्या. त्यानंतर या ठिकाणी छापा टाकताच फायबर बोटी व सेक्शन मधील इसम नदीतील पाण्यात उड्या मारुन पळुन गेले.

महसूल आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 10 फायबर बोटी व सेक्शन असा कोट्यवधी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केले. सदरची कारवाई श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष गोमसाळे, ज्ञानेश्वर पठारे, पोलीस शिपाई अजिनाथ खेडकर, सतिश शिंदे, विकास कारखीले, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com