घोड, भीमा नदीतून अनधिकृत वाळू उपसा

घोड, भीमा नदीतून अनधिकृत वाळू उपसा
File Photo

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील घोड, भीमा नदीतून अनधिकृत वाळू उपसा सुरू असून महसूल विभाग याकडे कानाडोळा करत आहे. वांगदरी हद्दीतील वाळूच्या लिलावाची पूर्तता झाली नसतानाही दहा ते पंधरा जेसीबीच्या साहाय्याने रोज वाळू उपसा होत असून वाळू तस्करांच्या दोन गटांत वाळू उपसा करण्यावरून वादही झाले.

हे प्रकरण थेट अनुसूचित जाती जमाती कायद्याच्यानुसार गुन्हा दाखल करण्यापर्यंत गेले मात्र काहींच्या मध्यस्थीनंतर प्रकरण मिटल्याची चर्चा आहे. अवैध वाळूचा धंदा जोरात सुरू असून महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी व पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. परिसरातील नागरिकांमधून वाळू तस्करांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.