घाटघरला 5 इंच पाऊस

मुळा धरणातही नवीन आवक
घाटघरला 5 इंच पाऊस

भंडारदरा, कोतूळ (वार्ताहर)| Bhandardara - भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या रतनवाडीत आणि घाटघरमध्ये अनुक्रमे चार आणि पाच इंच पाऊस झाल्याने गत 36 तासांत धरणात नव्याने 358 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 3199 दलघफू झाला होता.

भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने यशवंत, नानी, मनोहर, पांजरे हे धबधबे सुरू झाले आहेत. ओढेनालेही भरभरून वाहत असून धरणाच्या पोटात विसावत असल्याने साठा वाढत आहे. निळवंडे धरणात केवळ 7 दलघफू पाणी दाखल झाल्याने या धरणातील पाणीसाठा 4075 दलघफू झाला होता.

पडलेला पाऊस असा मिमीमध्ये- घाटघर 125, रतनवाडी 109, पांजरे 75, वाकी 43. काल दिवसभरात भंडारदरात 15 मिमी नोंद झाली आहे.

मुळा पाणलोटात पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगर दर्‍यांवरील ओढेनाले अद्यपही सक्रिय असल्याने मुळा नदी 1513 क्युसेकने वाहती आहे. गत 24 तासांत मुळा धरणात काल सकाळपर्यंत 64 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 7779 दलघफू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com