ना. बच्चू कडूंनी नगर तालुक्यातील ‘येथील’ ग्रामसेविकेच्या ‘या’ कामाची घेतली दखल ; पाठविले पत्र

ना. बच्चू कडूंनी नगर तालुक्यातील ‘येथील’ ग्रामसेविकेच्या ‘या’ कामाची घेतली दखल ; पाठविले पत्र
ग्रामसेविका प्रियंका भोर

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे एकलव्य समाजासाठी राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेची दखल घेत राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी ग्रामसेविका प्रियंका विठ्ठल भोर यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सौ. भोर यांना अभिनंदनाचे प्रोत्साहनपर पत्र पाठविले आहे.

आदिवासी भिल्ल समाजाला हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या शबरी आवास योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेचा योग्य समन्वय साधला. त्यातून कर्जुने खारे येथे शबरीनगर गृहसंकुल योजना राबविण्यात आली. या योजनेत तब्बल 60 कुटुंबाना पक्क्या घरकुलांचा लाभ मिळाला आहे. ही योजना पहिल्यांदाच इतक्या प्रभावीपणे राबविण्यात आली आहे.

नामदार बच्चू कडू यांनी कामाची दखल घेत पत्र पाठवून अभिनंदन केल्याने आनंद झाला असून काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. शासकीय योजनांचा लाभ थेट शेवटच्या घटकाला मिळावा यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. त्याला ग्रामस्थांनी योग्य साथ दिली आहे. त्यामुळेच देशातील पहिला प्रकल्प कर्जुने खारे येथे यशस्वी झाला आहे. यापुढेही विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावाच्या नियोजनपूर्वक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

- ग्रामसेविका प्रियंका भोर-जाधव

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com