घारीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

घारीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

कोपरगाव तालुक्यातील घारी शिवारात एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घारी गावच्या शिवारात शिर्डी-लासलगाव रस्त्यालगत दौलत दामू होन यांच्या मालकीचे शेतामधील पडक्या खोलीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेचे वय 25 असून तिचा गळा आवळल्याच्या खुणा पोलिस तपासात दिसून आल्या.

पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव हे करत आहे.

Related Stories

No stories found.