घारी येथे शेतातील कापूस चोरी

चोरांचा बंदोबस्त करण्याची शेतकर्‍यांची मागणी
घारी येथे शेतातील कापूस चोरी
कापूस

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील घारी येथील बयाजी पुंजा पवार यांच्या शेतातील वेचणीला आलेला दोन एकर क्षेत्रावरील कापूस अज्ञात चोरट्यांनी शनिवारी ता. 13 नोव्हेंबरच्या रात्री वेचून चोरून नेल्याची घटना घडली आहे. घारी येथील शेतातील कापूस चोरीचा तपास लावून चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

घारी येथील बयाजी पुंजा पवार यांनी गट क्रमांक 177 मध्ये दोन एकर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली आहे. कपाशीचे पीक अत्यंत चांगल्याप्रकारे आलेले आहे. एक वेळा कापसाची वेचणी देखील त्यांनी करून घेतली होती आणि आता दुसर्‍यांदा वेचणी करण्याच्या तयारीत असतानाच शनिवारी रात्री चंद्रप्रकाशाचा फायदा घेत चोरट्यांनी दोन एकर क्षेत्रावरील जवळपास सहा-सात क्विंटल कापूस वेचून चारून नेल्याचे बयाजी पवार यांनी सांगितले.

मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस, शेती उत्पादन खर्चात झालेली वाढ व शासनाची शेतकर्‍यांच्या बाबतीत असलेली उदासिनता यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत आला असताना ग्रामीण भागात मात्र शेतकर्‍यांना शेती करणे मोठे संकटाचे बनले आहे. दोन एकर क्षेत्रावर लावलेला कापूस वेचणीसाठी आला होता. लवकरच दोन पैसे हातात पडतील अशी शेतकर्‍यांची अपेक्षा असते. पोलीस प्रशासनाने अशा घटनांची दखल घेऊन या टोळ्यांना गजाआड करावे, अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकर्‍यांमधून पुढे आली आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत कधी विहिरीवरील मोटार, सायफन, केबल, स्टार्टर, कधी कृषी विषयक साहित्य आता तर थेट शेतातील उभी पिके चोरीला जात असल्यामुळे अशा टोळ्यांना प्रशासनाने गजाआड करण्याची गरज निर्माण झाली आहे.

- किसन पवार, शेतकरी घारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com