घारी येथील पूल पाण्याखाली गेल्याने तीन गावांतील लोकांचा संपर्क तुटला

घारी येथील पूल पाण्याखाली गेल्याने तीन गावांतील लोकांचा संपर्क तुटला

जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, देर्डे, चांदेकसारे व घारी येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने खडकी नदीवरील पूल रविवारी पाण्याखाली गेल्यामुळे चांदेकसारे, डाऊच बुद्रुक व घारी या गावांचा नगर मनमाड महामार्गावर जाण्यासाठी संपर्क तुटल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

धुव्वाधार पावसामुळे हा पूल अनेकवेळा पाण्याखाली जात असतो. या पुलाची उंची वाढवण्याची मागणी अनेक वेळा ग्रामस्थांनी शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींकडे केलेली आहे. मात्र या प्रश्नाकडे 15 वर्षांपासून कोणीच गंभीरपणे बघितले नाही. त्यामुळे पाऊस वाढला की, हा पूल पाण्याखाली जातो. अशा वेळी शेतकरी, दुग्ध उत्पादक, नोकरदार वर्ग, शालेय विद्यार्थी यासह विविध वर्गातील लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

जोपर्यंत पाण्याचा प्रवाह कमी होत नाही तोपर्यंत ही सर्कस अशीच सुरू असते. पर्यायी मार्ग नसल्यामुळे घारी गावातील ग्रामस्थांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली असल्याची मागणी घारी व डाऊचबुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com