संगमनेर : घारगावमध्ये अ‍ॅम्ब्युलन्सची चोरी

चोरट्यास काही तासातच अटक
संगमनेर : घारगावमध्ये अ‍ॅम्ब्युलन्सची चोरी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

नाशिकहून पुण्याला रुग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेची चोरी झाल्याची घटना तालुक्यातील घारगाव येथे काल रात्री घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नाशिक येथील एका रुग्णाला घेऊन एक रुग्णवाहिका क्रमांक एम एच 15 डी के 6060 ही पुण्याकडे जात होती ही रुग्णवाहिका घारगाव येथे काही वेळ थांबली. रुग्णवाहिका थांबल्याने रुग्णाचे नातेवाईकही खाली उतरले या संधीचा फायदा घेऊन एका चोरट्याने रुग्ग्वाहिका चोरली. रुग्णवाहिका चोरी झाल्याचे समजताच वाहन चालकाने घारगाव पोलिसांना ही माहिती दिली.

त्याने संगमनेर येथील आपल्या काही मित्रांना याबाबत कळवले. काही तासानंतर ही रुग्णवाहिका संगमनेर येथे आढळली. रुग्णवाहिका चालक योगेश रोंगटे याने याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी वैभव सुभाष पांडे याच्याविरुद्ध भादवी कलम 379, 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक लांघे हे करत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com