शाळा, महाविद्यालयांसाठी शनिवारी घंटानाद

शाळा, महाविद्यालयांसाठी शनिवारी घंटानाद

अहमदनगर (प्रतिनिधी)

महाराष्ट्रात (Maharashtra) दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी शाळा (School), महाविद्यालय (College) बंद असल्याने एका पिढीचे नुकसान होण्याच्या मार्गावर असल्याने पीपल्स हेल्पलाईन (People's Helpline), भारतीय जनसंसद (Bhartiy Jansansad) व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने शैक्षणिक पालकशाही अभियानाची (Educational Guardianship Campaign) घोषणा करण्यात आली.

या अभियानातंर्गत शाळा, महाविद्यालये सुरु (School College Reopen) होण्यासाठी विद्येची देवता श्री विशाल गणपती मंदिरासमोर (Shri Vishal Ganpati Temple) शनिवार, १८ सप्टेंबर रोजी घंटानाद आंदोलन (Ghanta Naad Andolan) केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

अनेक शिक्षण तज्ञांनी महाराष्ट्रात शाळा बंद (Maharashtra School Close) असल्याने लहान मुले व युवकांवर विपरीत परिणाम होऊन ते हिंसक व चुकीच्या पध्दतीने वागत असल्याचे अभ्यासाने निष्कर्ष काढले आहेत. करोनाचा (COVID19) बागुलबुवा करुन अधिक काळ शाळा, महाविद्यालये बंद ठेवता येऊ शकत नाही. त्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. शैक्षणिक पालकशाही अभियानाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांना पालकांनी सकाळ, संध्याकाळी उकडलेले अंडी, दुध देऊन दररोज योग, प्राणायामाचे धडे दिल्यास त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे.

करोनाचा (Coronavirus) आकडा शुन्यावर आणण्यासाठी या पध्दतीने मुलांना सुदृढ बनविण्यासाठी पालकांना आवाहन केले जाणार असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. आंदोलनास माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. या अभियानासाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादुर प्रजापती, ज्ञानदेव काळे, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com