अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांची देवगडला भेट

मंदिर निर्माण कार्याविषयी भास्करगिरी महाराजांशी केली चर्चा
अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांची देवगडला भेट

देवगडफाटा (वार्ताहर) -

श्री क्षेत्र देवगड येथे श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टचे महासचिव श्री.चंपतराय यांनी कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी श्रीक्षेत्र

देवगड येथे भेट देवून भगवान दत्तात्रय व श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांच्याशी चर्चा केली.

अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीच्या कामात अत्यंत व्यस्त असलेले चंपतराय यांनी श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे भास्करगिरी महाराजांची भेट घेत देवगड तीर्थक्षेत्राची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.

यावेळी भास्करगिरी महाराज यांच्याशी अयोध्या येथिल प्रभू श्री राम मंदीर बांधकामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर चंपत रायजी यांनी श्री क्षेत्र देवगड येथील मंदिर परिसराची पाहणी केली.

यावेळी हेमंत हरकारे, ज्योतिष पंडित भगूरे, अ‍ॅड. सुनील चावरे, व्यावसायिक श्री. बारगजे, सरपंच अजय साबळे, दत्तात्रय बहिरट महाराज, विश्वनाथ नानेकर उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com