पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन न घेता ऑफलाईन पद्धतीने घ्यावी- उपनगराध्यक्ष ससाणे

पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन न घेता ऑफलाईन पद्धतीने घ्यावी- उपनगराध्यक्ष ससाणे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पालिका प्रशासनाने सोमवार दि. 12 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने ठेवलेली आहे. अशा प्रकारची ऑनलाईन सभा घेण्याच्या मागचा सत्ताधार्‍यांचा हेतू समजून येत नाही. यामुळे अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन सभा घेणे हे नगरसेवकांच्या मत मांडण्याच्या मूलभूत अधिकारावर गदा आणल्यासारखे होईल. त्यामुळे श्रीरामपूर नगरपालिकेने सर्वसाधारण सभा ही ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे.

कारण एका बाजूला प्रशासनाने जिल्हा परिषद सारख्या 73 जिल्हा परिषद सदस्य असलेल्या संस्थेला ऑफलाईन सभा घेण्यास परवानगी दिली. दुसर्‍या बाजूला शासनाने 50 लोकांमध्ये लग्न लावण्याची सुद्धा परवानगी दिली आहे. मग असे असताना श्रीरामपूर नगरपालिका त्याला का अपवाद आहे. कारण अशा प्रकारची ऑनलाईन सभा ठेवल्याने आवाज न येणे, विरोधकांचा आवाज बंद करणे, गोंधळ होणे, विषय न मांडता येणे असे प्रकार होत असतात. मागील काही ऑनलाईन सभांमध्ये काही विरोधी सदस्यांनी आपला मुद्दा स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला असता नगराध्यक्षांनी संबंधित अधिकार्‍याला यांना मीटिंगमधून बाद करा अशी रागारागात धमकी देखील दिली होती.

त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ऑनलाइन सभा घेणे हे नगरसेवकांच्या मत मांडण्याच्या मूलभूत अधिकारवर गदा आणल्यासारखे होईल. त्यामुळे श्रीरामपूर नगरपालिकेने सर्वसाधारण सभा ही ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, असे मत उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी व्यक्त केले असून त्यांनी या ऑनलाईन सभेला विरोध दर्शविला आहे. त्याबाबत निवेदनही नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिले आहे.

याच संदर्भामध्ये जिल्हाधिकारी अहमदनगर यांनाही निवेदन देऊन श्रीरामपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासंदर्भात मागणी करण्यात येणार असल्याने ससाणे यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, संजय फंड, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर , काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक मुजफ्फर शेख, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, मनोज लबडे, नगरसेविका भारतीताई परदेशी, आशाताई रासकर, मीराताई रोटे उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com