गायत्री कंपनीने वाहनांच्या वेगाला आवर घालावा - चव्हाण

गायत्री कंपनीने वाहनांच्या वेगाला आवर घालावा - चव्हाण

जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरु असून काम अंतिम टप्प्यात आले आहे. काम सुरू झाल्यापासुनच कंपनीच्या वाहनांचा वेग हा काळजीचा विषय बनला आहे. काम लवकर पूर्ण करण्यासाठी गायत्री कंपनी घाई करत आहे. डंपर च्या साह्यांने वाहतूक करत असताना चालक वेगावर नियंत्रण न ठेवता अति भरधाव वेगाने वाहन चालवत असतात. त्यामुळे या रस्त्यावरून जाणार्‍या इतर प्रवाशांच्या जिवाला धोका होवू शकतो. म्हणून गायत्रीच्या वाहन चालकांनी वेगावर आवर घालावा, अशी मागणी जालिंदर चव्हाण यांनी केली.

गायत्रीच्या वाहनांमधून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. रस्त्याच्या कडेने शेतकरी व नागरिक जात असतात. गायत्री कंपनीचे वाहने भरधाव वेगाने जात असल्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालणे अवघड होऊन नागरिकांना जीवघेणा ठरत आहे.

गुरूवारी जेऊर कुंभारी परिसरात किरण परसराम गुरसळ शेतात जात असतांना गायत्री कंपनीच्या वाहनांचा त्यांना धक्का लागुन जखमी झाले. ही घटना जालिंदर चव्हाण यांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले व गायत्री कंपनीचे वाहतूक करणारे डंपर अडवुन वेगावर नियंत्रण ठेवण्याची तंबी दिली. परीसरातील नागरिकांना त्रास झाला तर सहन केला जाणार नाही. असे काही घडल्यास गायत्री कंपनीचे काम बंद केले जाईल, असा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com