गायत्री कंपनीमुळे ऐन सणासुदीला शेतकरी अंधारात

गायत्री कंपनीमुळे ऐन सणासुदीला शेतकरी अंधारात

जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhar

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील गोरक्षनाथ रोड परिसरात गायत्री कंपनीचा खडी क्रेशरचा मोठा प्लांट आहे. त्यामुळे गोरक्षनाथ रोडावर त्यांच्या अवजड वाहनांची दररोज वर्दळ असते. ऐन दिवाळी सारख्या सणाला गायत्री कंपनीच्या वाहनांमुळे मेन लाईनची विद्युत वितरण करणारी विद्युत तार तुटल्याने या भागातील सर्व परिसर ऐन दिवाळीत अंधारात गेला आहे. समृद्धी महामार्गाचे काम करणार्‍या गायत्री कंपनीच्या अधिकार्‍यांना सागुन देखील ते याकडे जणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.

हिंदू धर्मातील वर्षातला हा सर्वात मोठा सण असून अतिशय महत्त्वाचा आहे. इतकी मोठी घटना घडून देखील गायत्री कंपनीच्या कुठल्याही अधिकार्‍याने समक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याची तसदी देखील घेतली नाही. गायत्री कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी बांधवांना दिवाळी अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे या गायत्री कंपनीच्या मनमानी कारभारावर स्थानिक शेतकरी अशोक होन, किशोर होन, सुशांत होन, दिपक होन, शांतीलाल होन, संकेत होन, शिवाजी होन, ज्ञानेश्वर होन, भगीरथ होन, सुनील होन, बाळू खरात, अशोक खरात, दिलीप खरात, शुभम खरात, सुधाकर खरात यांनी नाराजी व्यक्त केली. लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरू करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com