गायत्री कंपनीने शेतकरी व वाहन चालकांचे पैसे थकवले

शेतकर्‍यांचा अधिकार्‍यांना घेराव
गायत्री कंपनीने शेतकरी व वाहन चालकांचे पैसे थकवले

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव (Kopargav) तालुक्यातून मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai Nagpur Samrudhi Highway) काम चालू आहे. समृद्धी महामार्गासाठी अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी (Farmers Land) घेत शेतकर्‍यांमध्ये या मार्गाने समृद्धी आणली. मात्र कोपरगाव (Kopargav) तालुक्यात चांदेकसारे (Chadeksare) परिसरात गायत्री कंपनीच्या (Gayatri Company) अधिकार्‍यांनी मात्र काही शेतकर्‍यांना व समृद्धी महामार्गासाठी कामावर लावलेल्या वाहनांचे पेमेंट थकविल्याने (Due to vehicle payment fatigue) शेतकरी भूमिपुत्रांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकरी व वाहन मालकांनी थेट गायत्री कंपनीच्या अधिकार्‍यांना घेराव घातला. अधिकारी थोडेसे नरमले आणि त्यांनी 22 जुलै पर्यंत सर्व पेमेंट करण्याचे आश्वासन दिले.

गायत्री कंपनीने (Gayatri Company) या परिसरात मुंबई-नागपूर महामार्गाच्या कामासाठी शेतकर्‍यांकडून भाडेपट्टीवर काही जमिनी घेतल्या ( He took some lands on lease from the farmers) तर काही शेतकर्‍यांच्या जमिनी विकत घेतल्या. समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ये-जा करण्यासाठी काही शेतकर्‍यांच्या शेतातून रस्ते भाडेतत्वावर घेतले मात्र या शेतकर्‍यांना गायत्री कंपनीने अजूनपर्यंत मोबदला दिला नसल्याने शेतकरी वर्गात ही नाराजी व्यक्त झाली आहे.

वाहनचालकांच्या मालकांनाही या कंपनीने जवळपास सात आठ महिन्यांपासून पेमेंट (Payment) केले नसल्याने कर्ज (Loan) काढून घेतलेल्या मशीनचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. याबाबत सर्वांनी काल एकत्रित येत कंपनीच्या अधिकार्‍यांना घेराव घातला. कंपनीचे काम होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर मात्र कंपनीचे अधिकारी नरमले आणि त्यांनी 22 जुलै पर्यंत पेमेंट करण्याचे आश्वासन दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com