गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात येऊ नये

चिंचोली ग्रामस्थांची शासनाकडे मागणी
गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात येऊ नये

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शासकीय व गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढून टाकण्याच्या निर्णयामुळे हतबल झालेल्या चिंचोली येथील ग्रामस्थांनी राहुरीचे तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन अतिक्रमण काढू नयेत, अशी मागणी केली आहे.

चिंचोलीसह सर्वच गावांना न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला असून वर्षानुवर्षे स्थायिक होऊन स्थिरस्थावर झालेल्या कुटुंब व ग्रामस्थांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. या नोटिसधारकांच्या तोंडचे पाणी पळाले असून बेघर होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिंचोली येथील ग्रामस्थांनी सरपंच गणेश हारदे व माजी सदस्य सर्जेराव लाटे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देऊन उद्ध्वस्त होणार्‍या कुटुंबाना बेघर होण्यापासून वाचविण्याची विनंती केली आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात त्यांनी ही कुटुंबे बेघर होऊ नयेत म्हणून शासनाने विचार करून निर्णय घेण्याची विनंती केली आहे. तहसीलदारांच्या वतीने तलाठ्यांनी हे निवेदन स्वीकारले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com