गावठी कट्टा बाळगणार्‍या तरूणास अटक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी
गावठी कट्टा बाळगणार्‍या तरूणास अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गावठी कट्टा (Gavthi Katta) व 2 जिवंत काडतुसे (Cartridges) बाळगणार्‍या पुणतांबा (ता. राहाता) येथील यश उर्फ चिक्या बाळासाहेब लांडगे (वय 22) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी सापळा रचून जेरबंद (Arrested) केले. त्याच्याकडे 30,000 रु. किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल (Gavthi Pistol) व 600 रु. किमतीचे 2 जिवंत काडतुसे असा 30,600 रु. किमतीचा मुद्देमाल मिळुन आला.

पोलीस उप महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील (Deputy Inspector General of Police B. G. Shekhar Patil) यांनी अवैधरित्या शस्त्रे बाळगणार्‍या विरुद्ध करावाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिल्याने जिल्हयात स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आले होते. विशेष पथकातील अधिकारी व अमलदार जिल्हयात अवैध गावठी कट्टे बाळगणार्‍या व्यक्तींची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके (LCB PI Anil Katke) यांना गोपनिय माहीती मिळाली कि, गोंडेगाव (ता. श्रीरामपूर) येथील चितळीकडे (Chitali) जाणान्या पुलाजवळ एक मुलगा देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुसे जवळ बाळगून फिरत आहे. या माहितीवरून पोलीस निरीक्षक श्री. कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकातील सहायक पोलीस निरिक्षक गणेश इंगळे, पोलीस हेड कॉन्टेबल विजयकुमार वेटेकर, पोलीस नाईक विशाल दळवी, सुरेश माळी, शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोलीस कॉन्टेबल राहुल सोळुंके व रणजीत जाधव यांना सदर व्यक्तीवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

त्यानुसार पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी गोंडेगाव, चितळी रोडचे पुलाजवळ जावून सापळा लावला असता या ठिकाणी एक व्यक्ती संशयीत नजरेने टेहाळणी करताना दिसला. खात्री होताच त्याला घेराव घालुन ताब्यात घेतले. त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने यश उर्फ चिक्या बाळासाहेब लांडगे (वय 22, रा. पुणतांबा ता. राहाता जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगीतले. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे 30,000 रु. किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व 600 रु. किमतीचे 2 जिवंत काडतुसे असा 30,600 रु. किमतीचा मुद्देमाल मिळुन आला. सदर गावटी कट्टा व काडतुसांबाबत त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा गावठी कट्टा व काडतुसे त्याचे साथीदाराकडुन विकत घेतल्याचे सागिीतलेे. त्याप्रमाणे साथीदाराच्या राहते घरी शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.

पोलीस कॉन्टेबल रणजीत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनला यश उर्फ चिक्या बाळासाहेब लांडगे याच्याविरुद्ध गुरनं. 344 / 2021, भारतीय हत्यार कायदा कलम 3 / 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत. पोलीस उप महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, यांचे आदेशाने अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com