स्वत:च्या आई, पत्नी व मुलींना ठार मारणार होता, पुढे झाले असे काही...

स्वत:च्या आई, पत्नी व मुलींना ठार मारणार होता, पुढे झाले असे काही...

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

स्वतः ची आई, पत्नी व मुली हे कायम त्रास देतात म्हणून त्यांचा कायमचा काटा काढण्यासाठी एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विकत घेणार्‍या तरुणास नेवासा पोलिसांनी गजाआड केले. पोलिसांनी प्रसंगावधान राखून या तरुणाला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला आहे.

17 जानेवारी 2023 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास लताबाई किशोर कुंभकर्ण (रा. औंदुबर चौक पोस्ट ऑफिस समोर नेवासा खुर्द, ता. नेवासा) यांना त्यांचा मुलगा सागर किशोर कुंभकर्ण हा त्यांना व त्यांची सून प्रांजल तसेच नात श्रेषा, माही, श्रावणी या सर्वांना विनाकारण लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत आहे असे पोनि विजय करे यांना सांगितले होते.

त्याची दखल घेत करे यांनी पोहेकॉ गिते, पोना/ दहिफळे, पोकॉ/शाम गुंजाळ व पोकॉ. रामदास वैद्य या सर्वांना सदर ठिकाणी जाऊन पीडित महिला व सदर इसमास घेऊन पोलीस स्टेशनला या व त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करा असे आदेश दिले होते. त्यावरून पोहेकॉ गिते, पोना दहिफळे पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ वैद्य संबंधित ठिकाणी जाऊन सागर कुंभकर्ण यास ताब्यात घेतले व त्याची आई लताबाई यांना तक्रार देण्यास पोलीस स्टेशनला येण्यास कळविले त्यानंतर पोलीस स्टेशन नेवासा येथे आल्यानंतर पोनि विजय करे यांनी सागर किशोर कुंभकर्ण यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता, मला माझी आई, पत्नी व मुली हे कायम त्रास देतात.

मी त्यांचा कायमचा काटा काढण्यासाठी एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विकत घेतलेले असून त्यांना मी ठार मारणार आहे. सदर गावठी कटटा व जिवंत काडतुसे मी माझे घराच्या तिसर्‍या मजल्यावरील कपाटात लपवून ठेवली आहे असे त्ययाने सांगितल्यानंतर पो. नि. करे हे त्यांचे सहकारी तसेच किशोर कुंभकर्ण याला बरोबर घेऊन त्याच्या घरी गेले.

सागर कुंभकर्ण याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या घराच्या तिसर्‍या मजल्यावरील बेडरुममधून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास लाकडी कपाटामधील ड्रावरमधून एक गावटी कट्ट्ा व 9 जिवंत काडतुसे काढून दिले. पोलीस कॉन्स्टेबल शाम बाबासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादवरुन सागर अशोक कुंभकर्ण याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन या गुन्ह्यांत सागर अशोक कुंभकर्ण याला अटक केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com