गावठी कट्ट्यासह तरूण जेरबंद

तालुका पोलिसांची रूईछत्तीशीत कारवाई
गावठी कट्ट्यासह तरूण जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणार्‍या तरुणाला पोलिसांनी अटक केली. राजू कुंडलीक खकाळ (रा. रूईछत्तीशी ता. नगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. रूईछत्तीशी एसटी बस स्थानकाजवळ नगर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस नाईक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून खकाळ विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रूईछत्तीशी बस स्थानकाजवळ एक तरूण कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जारवाल, पोलीस अंमलदार बी. एस. गांगर्डे, लगड, ठाणगे, सोनवणे यांच्या पथकाने खकाळ याला रूईछत्तीशी बस स्थानकावरून ताब्यात घेत त्याची पंचासमक्ष झडती घेतली.

त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी त्याला अटक करत कट्टा, काडतुसे जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com