गावठी कट्टा घेऊन फिरणार्‍यास अटक

बेलवंडी फाटा येथे कारवाई || एक कट्टा, चार काडतुसे जप्त
गावठी कट्टा घेऊन फिरणार्‍यास अटक

अहमदनगर |श्रीगोंदा | प्रतिनिधी| Ahmednagar

विक्री करण्याच्या उद्देशाने एक गावठी कट्टा (Gavthi Katta) व चार जिवंत काडतूस (Live cartridge) कब्जात बाळगणार्‍याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी (LCB Police Arrestd) पकडले. किरण अरूण दरेकर (वय 33 रा. करंदी ता. शिरूर जि. पुणे) असे अटक (Arrested) केलेल्याचे नाव आहे. श्रीगोंद्यातील (Shrigonda) बेलवंडी फाटा (Belwandi Phata) येथे पोलिसांनी ही कारवाई (Police Action) केली. दरेकर यांच्याकडून गावठी कट्टा (Gavthi Katta) व चार जिवंत काडतुस (Live cartridge), असा एकूण 25 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके (LCB PI Anil Katke)यांनी दिली.

किरण दरेकर हा बेलवंडी फाटा परिसरात कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती. त्यांनी सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस अंमलदार विजय वेठेकर, भाऊसाहेब कुरूंद, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने बेलवंडी फाटा येथील साई गार्डन हॉटेलसमोर सापळा लावून संशयित इसमाला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने किरण दरेकर असे नाव सांगितले. त्याच्या अंगझडतीमध्ये गावठी कट्टा, जिवंत काडतुसे मिळून आली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो हा कट्टा विक्रीसाठी घेऊन आल्याचे समोर आले. पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com