गावठी कट्ट्यासह तरूण जेरबंद

कोतवाली पोलिसांची केडगावमध्ये कारवाई
गावठी कट्ट्यासह तरूण जेरबंद

अहमदनगर|Ahmedagar

गावठी कट्टा (Gavthi Katta) व दोन जिवंत काडतूसे (Cartridges) जवळ घेऊन फिरणार्‍या तरूणाला कोतवाली पोलिसांनी अटक (Kotwali Police Arrested) केली आहे. भुषण रजणीकांत निकम (वय 40 रा. एमआयडीसी, नगर) असे अटक (Arrested) केलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्याकडून एक दुचाकी, गावठी कट्टा (Gavthi Katta), दोन काडतुसे असा 45 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे. निकम विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) बुधवारी रात्री साडेअकरा वाजता केडगाव (Kedgav) उपनगरात ही कारवाई केली. केडगावमध्ये (Kedgav) एक तरूण दुचाकीवर गावठी कट्ट्यासह (Gavthi Katta) फिरत असल्याची गोपनीय माहिती कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे (Kotwali inspector Sampat Shinde) यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस अंमलदार बंडू भागवत, शाहिद शेख, नितीन घाडगे, सुमीत गवळी, अभय कदम, प्रमोद लहारे, सुशील वाघेला यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सुचना केल्या. पथकाने केडगावातील (Kedgav) कारमेल शाळेजवळ निकम याला पकडून त्याची झडती घेतली असता गावठी कट्टा, काडतूसे मिळून आली. पोलिसांनी मुद्देमालासह त्याला ताब्यात घेत अटक (Arrested) केेली. पुढील तपास कोतवाली पोलीस (Kotwali Police) करीत आहे.

Related Stories

No stories found.