गावठी दारूमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न
File Photo

गावठी दारूमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

कर्जतमधील शासकीय यंत्रणे दुर्लक्ष

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत तालुक्याच्या (Karjat) ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गावठी दारू (Gavthi Alcohol) तयार करण्याचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. दररोज हजारो लिटर दारूची (Alcohol) निर्मिती या भट्ट्यामधून होते. दिवसा तसेच रात्रीच्या वेळी दारू (Alcohol) काढण्याचे काम चालते. या अवैध धंद्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होते. शासकीय यंत्रणांची मात्र याकडे डोळेझाक होताना दिसत आहे.

राशीन (Rashin), मिरजगाव (Mirjgav), कुळधरण (Kuldharan) यासह तालुक्याच्या अनेक भागात हे अवैध धंदे ( Illegal Business) जोमात सुरू आहेत. गावानजीकचे ओढे-नाले, काटेरी झुडपांचा आश्रय घेऊन हे अड्डे सुरु असतात. सुरुवातीला गावठी दारू तयार करून आपल्या गावात विकण्याचे उद्योग काहींनी सुरू केले. पुढे लाखो रुपयांची कमाई करत मजूर ठेवून हा धंदा मोठा केल्याचे दिसते. यातून दारूचे अड्डे चालवणारे बरेच शेठ कर्जत तालुक्यात तयार झालेले आहेत. हप्तेखोरीने बरबटलेली शासकीय यंत्रणा हे अवैध धंदे (Illegal Business) रोखण्यासाठी कुचकामी ठरत असल्याचा सूर जनतेतून उमटत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com