मातापूर येथे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांचा छापा

File Photo
File Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर येथे गोपाळवस्ती येथे राहत्या घराच्या भिंतीआड अडोशाला सुरू असणार्‍या हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 6 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि.14 ऑक्टोबर रोजी 1.15 च्या सुमारास नितीन रामदास पवार, गोपाळवस्ती मातापूर याच्या राहत्या घराच्या भिंतीआड गावठी हातभट्टीची तयार दारू व कच्चे रसायन विक्री करताना आढळून आला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 939/2022 प्रमाणे पोलिसात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (इ)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल परदेशी हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com