22 दिवसांत 49 लाखाची गावठी दारू नष्ट

विशेष मोहिमेत 603 आरोपींविरोधात कारवाई
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विशेष माहिमेदरम्यान नगर जिल्ह्यात विविध 603 ठिकाणी अवैध दारु व गावठी हातभट्टी प्रकरणी 603 आरोपी विरुध्द पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत 49 लाख 36 हजार 198 किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे राबवली.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव व इतर सण उत्सव अनुषंगाने 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील अवैध दारु विरोधात विशेष मोहिमेचे आयोजन कारवाई करण्यात आले होते. यात 14 तालुक्याचे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरिक्षक, तसेस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले. या सर्वांनी आपआपले पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारु, गावठी हातभट्टयांचा शोध घेवून 542 ठिकाणांवर छापे घातले व 542 आरोपींना ताब्यात घेत 27 लाख 8 हजार 913 रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट केला. तर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतंत्रपणे 61 ठिकाणंवर छापे घातले व 61 आरोपींना ताब्यात घेवुन 22 लाख 27 हजार 285 किंमतीचा अवैध दारूचा साठा जप्त करून तो नष्ट केला.

अशा प्रकारे पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात 603 ठिकाणांवर छापे घातले व 603 आरोपींना ताब्यात घेत 49 लाख 36 हजार 198 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन तो नष्ट केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल, अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com