गावरान कोंबड्यांवर चोरट्यांचा डल्ला

भुरट्या चोरांचे कारनामे
गावरान कोंबड्यांवर चोरट्यांचा डल्ला

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील तेलंगशी रोड रस्त्यावरील संतोष थोरात यांच्या कोंबड्याच्या शेडचा दरवाजा तोडत कोंबड्या घेऊन चोरटे फरार झाले.

थोरात यांचे खर्डा तेलंगशी रस्त्यावरील गवळवाडी शिवारात शेतात कोंबड्याचे शेड असून त्या शेडच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतमधील 9 हजार 300 रुपये किंमतीच्या 32 गावरान कोंबड्या चोरट्यांनी चोरून नेल्या. संतोष थोरात शेतात गेले असता त्यांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ खर्डा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून तक्रार दाखल केली आहे. कोंबड्यांचा शोध लावून ज्यांनी कोणी हे कृत्य केले त्यास शिक्षा द्यावी तसेच परिसरात चोरीच्या घटना घडून नयेत याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सध्या आषाढ महिना असल्यामुळे देव देवतांना कोंबडे, बकरे यांचा बळी देऊन पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी वशाट खाऊन घेण्यावर अनेकांचा भर असतो. परिणामी बाजार वाढत असल्याने आषाढ महिन्यात कोंबड्या, बकरे आदींंची चोरी करून चोरटे हात सफाई करत असल्याचे वास्तव आहे. खर्डा येथे नव्यानेच पोलीस चौकीचे उद्घाटन झाले त्यातच परिसरात होणार्‍या भुरट्या चोर्‍या, छोट्या मोठ्या चोर्‍या यावर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान नवीन झालेल्या पोलीस स्टेशन येथील कर्मचार्‍यांवर आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com