रेल्वेतून पडलेल्या तरूणाजवळ आढळला गावठी कट्टा

गुन्हा दाखल
रेल्वेतून पडलेल्या तरूणाजवळ आढळला गावठी कट्टा

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी (Rahuri) तालुक्यातील धामोरी (Dhamori) शिवारात एक तरूण चालत्या रेल्वेतून (Railway) खाली पडल्याने जखमी (Injured) झाला. त्याच्या मदतीसाठी परिसरातील काही नागरिक धावून गेलेे. मात्र, त्याच्याजवळ गावठी कट्टा (Gavathi Katta) आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

रेल्वेतून पडलेल्या तरूणाजवळ आढळला गावठी कट्टा
करंजी घाटात जळालेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला

एक तरूण रेल्वेतून प्रवास करीत असताना राहुरी तालुक्यातील धामोरी शिवारात रेल्वेतून खाली पडला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार चंद्रकांत बर्‍हाटे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तो तरूण जखमी (Injured) अवस्थेत खाली पडलेला दिसून आला. त्याच्या जवळच त्याची बॅग पडलेली होती. पोलिसांनी ती बॅग ताब्यात घेऊन तपासली असता, त्या बॅगेत 56 हजार रुपये रोख रक्कम व 20 हजार रुपये किंमतीचा एका गावठी कट्टा (Gavathi Katta) असा एकूण 76 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

रेल्वेतून पडलेल्या तरूणाजवळ आढळला गावठी कट्टा
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजी कर्डिले

पोलिसांनी गावठी कट्ट्याबाबत (Gavathi Katta) त्या तरूणाला चौकशी केली असता, त्याने काहीच माहिती दिली नाही. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव पृथ्वीराजे मुरलीधर निंबाळकर (रा. अदरकिनी, ता. फलटण जि. सातारा) असे सांगीतले. तो तरूण जखमी अवस्थेत असल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

रेल्वेतून पडलेल्या तरूणाजवळ आढळला गावठी कट्टा
घरासमोर बसलेल्या महिलेच्या गळ्यातील चैन चोरट्यांनी केली लंपास

सहाय्यक फौजदार चंद्रकांत बर्‍हाटे यांच्या फिर्यादीवरून काल आरोपी पृथ्वीराजे मुरलीधर निंबाळकर याच्यावर गुन्हा रजि. नं. 270/2023 शस्त्र अधिनियम 1959 कलम 25, 3 प्रमाणे राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वेतून पडलेल्या तरूणाजवळ आढळला गावठी कट्टा
सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक परिक्षेसाठी 253 उमेदवार पात्र
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com