
अहमदनगर |सचिन दसपुते| Ahmednagar
जिल्ह्यातील गावठी कट्टे खरेदी-विक्रीचे रॅकेट शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक अनिल कटके व त्यांचे पथक काम करत आहे. त्यांनी नुकतीच कोल्हार (ता. राहाता) परिसरात कारवाई करून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन कट्टे व तीन काडतुस जप्त केले आहे.
अटकेतील आरोपींकडून गावठी कट्टे विक्रीचे रॅकेट समोर आले. श्रीरामपूर शहरात रात्रीच्या वेळी रिक्षा चालविणारा, लोणी परिसरात हमाली काम करणारा कट्टे खरेदी-विक्रीच्या धंद्यात एजंट म्हणून कार्यरत आहे. त्यांना गंभीर स्वरूपाचे तब्बल 17 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांकडून कट्टे पुरविले जाते. एजंट मार्फत गावठी कट्ट्यांची विक्री अवैध वाळू, दारू व इतर अवैध धंदे करणार्यांना केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
अहमदनगर- जिल्ह्यातील गावठी कट्टे खरेदी-विक्रीचे रॅकेट शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक अनिल कटके व त्यांचे पथक काम करत आहे. त्यांनी नुकतीच कोल्हार (ता. राहाता) परिसरात कारवाई करून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन कट्टे व तीन काडतुस जप्त केले आहे. अटकेतील आरोपींकडून गावठी कट्टे विक्रीचे रॅकेट समोर आले. श्रीरामपूर शहरात रात्रीच्या वेळी रिक्षा चालविणारा, लोणी परिसरात हमाली काम करणारा कट्टे खरेदी-विक्रीच्या धंद्यात एजंट म्हणून कार्यरत आहे. त्यांना गंभीर स्वरूपाचे तब्बल 17 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांकडून कट्टे पुरविले जाते. एजंट मार्फत गावठी कट्ट्यांची विक्री अवैध वाळू, दारू व इतर अवैध धंदे करणार्यांना केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
एलसीबीच्या पथकाने कोल्हार परिसरात केलेल्या कारवाईत कट्टे विक्रीतील मुख्य सूत्रधार दुर्गेश बापु शिंदे (रा. वार्ड नं 7, श्रीरामपूर), एजंट हारूण ऊर्फ राजू रशिद शेख (रा. वार्ड नं 2, श्रीरामपूर), एजंट अश्पाक ऊर्फ मुन्ना रफिक पटेल (रा. कोल्हार), कट्टा विकत घेणारा प्रसन्न विलास लोखंडे (रा. कोल्हार) व सदानंद राजेंद्र मनतोडे (रा. शिबलापूर ता. संगमनेर) यांना अटक केली. दुर्गेश शिंदे वर गंभीर स्वरूपाचे 17 गुन्हे दाखल आहे. तो गावठी कट्टे मध्यप्रदेश येथील जंगलातून खरेदी करतो. त्यांची विक्री हारूण व अश्पाक यांच्या मार्फत श्रीरामपूर, संगमनेर, राहाता, राहुरी आदी तालुक्यात केली जाते.
दुर्गेश याचे मध्यप्रदेश येथील व्यक्तीसोबत संबंध आहे. तेथील व्यक्तीबरोबर संपर्क झाल्यानंतर तो स्वत: गावठी कट्टे व काडतुसे घेऊन येतो. साधारण सहा ते सात हजार रूपये किंमतीमध्ये हा कट्टा आणला जातो. त्यासाठी महाराष्ट-मध्यप्रदेश सिमेवर याच्यात व्यवहार होतो. तेथून हे कट्टे नगर जिल्ह्यात येतात. दुर्गेशने आणलेले कट्टे तो एजंट मार्फत विक्री करतो. दरम्यान 17 गुन्हे दाखल असलेला दुर्गेश पोलिसांना चकवा देत होता. एलसीबीचे पथक त्याच्या मागावर होते. पोलीस आपल्याचा पकडण्यास आल्याची चाहूल लागताच तो पळाला. पथकाने त्याचा पाठलाग केला. तो जवळच एका झाडामध्ये लपला होता. त्याच ठिकाणी त्याला झडप घालून पकडले आणि गावठी कट्टे खरेदी-विक्रीचे रॅकेट समोर आले.
हारूण शेख हा श्रीरामपूर शहरात रात्रीच्या वेळी रिक्षा चालवितो. त्याच्याकडून गावठी कट्ट्यांची विक्री केली जाते. साधारण 25 ते 30 हजार रूपये किंमतीमध्ये एक कट्टा व त्यासोबत दोन काडतुसे दिली जातात. तसेच अश्पाक पटेल हा एक कामगार आहे. तो कट्टे विक्रीत सक्रिय आहे. त्याच्याकडून राहाता, संगमनेर भागात कट्टे विक्री केले जातात. अशा हा कट्टे विक्रीचा खेळ सुरू असतो. याची कुणकुण एलसीबीच्या पथकाला लागताच त्यांनी सर्व आरोपींना ताब्यात घेत कट्टे खरेदी-विक्रीचे रॅकेट उघड केले.
एलसीबीने अटक केलेला प्रसन्न लोखंडे याच्याकडून एक कट्टा हस्तगत केला. तो गुजरात राज्यातून वाळू वाहतुक करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी तो कट्ट्यांचा वापर करत असल्याची शक्यता आहे. दरम्यान गावठी कट्टे सहज उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर धमकविण्यासाठी किंवा एखाद्यांचा गेम वाजविण्यासाठी केला जात असल्याने कट्ट्यांचा खेळ रोखण्याचे मोठे आव्हान एलसीबी पथकावर आहे.
अवैध धंदे करणार्यांना विक्री
एलसीबीने संगमनेर येथील सदानंद मनतोडे याला अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत केला. तो अवैध धंद्यात सक्रिय असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. गावठी कट्ट्यांचा वापर अवैध धंदे करणार्या व्यक्तीकडून सर्रास होत असल्याचे यातून पुढे आले आहे. यामुळे गावठी कट्ट्यांचा खेळ जिल्ह्यात जोरात सुरू असल्याचे दिसून येते.