गावठी कट्टा, दोन काडतुसांसह युवकाला अटक

एलसीबीची ईमामपूर घाटात कारवाई
गावठी कट्टा, दोन काडतुसांसह युवकाला अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एक गावठी कट्टा (Gavthi Katta) व दोन जिवंत काडतुसांसह एका युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी अटक (Arrested) केली. सागर महेंद्र त्रिभुवन (वय 20 रा. वडगाव कोल्हाटी, ता. जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून कट्टा, काडतुसे असा 30 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी सकाळी ईमामपूर घाटात (Imampur Ghat) ही कारवाई केली. त्रिभुवन विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार विजयकुमार वेठेकर यांनी फिर्याद दिली आहे.

नगर-औरंगाबाद रोडवरील (Nagar-Aurangabad Road) ईमामपूर घाटात (Imampur Ghat) एक युवक गावठी कट्टा घेऊन बंद पडलेल्या हॉटेलसमोर थांबला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके(PI Anil Katke) यांना मिळाली. त्यांनी सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार नानेकर, भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, सोनाली साठे यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने ईमामपूर घाट येथे जाऊन सदर युवकाला ताब्यात घेत त्याची पंचासमक्ष झडती घेतली. त्याच्याकडे कट्टा व काडतुसे मिळून आली. आरोपी त्रिभुवन विरोधात वाळूज (जि. औरंगाबाद) एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) एक गुन्हा दाखल आहे. पुढील तपास नगर एमआयडीसी पोलीस (MIDC Police) करीत आहेत.

Related Stories

No stories found.