
सोनई |वार्ताहर| Sonai
सोनई पोलिसांनी (Sonai Police) गावठी हातभट्टी (Gavathi Alcohol) बनवण्याच्या अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली.
याबाबत माहिती अशी की, सोनई-राहुरी रोड (Sonai Rahuri Road) लगत धनगर गल्ली येथे पत्राच्या टपरीच्या आडोशाला देशी गावठी हातभट्टीची (Gavathi Alcohol) तयार दारू विक्री करण्याच्या उद्देशाने एक इसम आला असल्याच्या माहितीवरून सोमवारी सोनई पोलिसांनी छापा (Sonai Police Raid) टाकला असता त्याठिकाणी नामदेव रामचंद्र शिंदे (वय 52) याच्या कब्जात गावठी दारू (Gavathi Alcohol) बाळगताना मिळून आल्याने त्याचेवर पोलीस कॉन्स्टेबल अमोल जवरे यांचे फिर्यादीवरून 484/22 महाराष्ट्र दारू कायदा कलम 65 (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बी बी अकोलकर पुढील तपास करत आहे.