
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहराच्या मध्यवर्ती परिसरातील गौरीघुमट (Gaurighumat) येथे महापालिकेने (Municipal Corporation) सात पक्या अतिक्रमणांवर कारवाई (Action on Encroachments) करून ती जमीनदोस्त केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार (High Court Order) गुरूवारी सकाळी ही कारवाई (Action) करण्यात आली.
गौरीघुमट (Gaurighumat) परिसरात महापालिकेची (Municipal Corporation) मोकळी जागा आहे. या जागेवर अनेक वर्षांपासून पक्की अतिक्रमणे (Encroachments) करण्यात आली होती. या संदर्भात तेथील स्थानिक रहिवासी नामदे यांनी तक्रार केली होती. उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी (Hearing) होऊन कारवाईचे आदेश महापालिकेला (Municipal Corporation) देण्यात आले होते. 5 मे पर्यंत कारवाई करून 6 मे रोजी अहवाल सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने महापालिकेला (Municipal Corporation) दिल्या होत्या. तसेच पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याबाबत आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने (Municipal Encroachment Elimination Department) गुरूवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू केली. गौरीघुमट व मनपा शाळेच्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेतील निवासी व व्यावसायिक अशी सात पक्की अतिक्रमणे जेसीबीच्या साहायाने जमीनदोस्त करण्यात आली. शहर अभियंता सुरेश इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख त्यांच्या कर्मचार्यांनी ही कारवाई केली.