गॅस रिफेलिंग सेंटरवर छापा

रिक्षासह गॅस टाक्या जप्त
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

इंम्पेरिअल चौकाजवळील (Imperial Chowk) एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापराच्या गॅस टाकीतून (Gas Tank) रिक्षा गॅस भरताना पुरवठा विभागाने छापा (Supply Division Raid) टाकून कारवाई केली. याप्रकरणी गोपीचंद सुनील आरडे (रा. माहित नाही) याच्याविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

File Photo
संगमनेरात दरोड्याच्या तयारीतील टोळी पोलिसांच्या जाळ्यात

पुरवठा निरीक्षक निशा मोरेश्वर पाईकराव यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात (Kotwali Police Station) फिर्याद दिली आहे. दि. 10 रोजी दुपारी साडेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली. पुरवठा विभागाच्या (Supply Division) पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता, एका पत्र्याच्या शेडमध्ये आरडे हा एका मशिनव्दारे घरगुती वापराच्या गॅस टाकीतून रिक्षामध्ये (एमएच 16 सीई 2252) मध्ये गॅस (Gas) भरत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडे गॅस परवाना नसल्याचे त्याने सांगितले.

या कारवाईत 43 हजार रूपये किंमतीच्या एचपी गॅस कंपनीच्या पूर्ण भरलेल्या लाल रंगाच्या घरगुती वापराच्या टाक्या, 5 हजाराच्या एचपी गॅस (Gas) कंपनीच्या रिकाम्या लाल रंगाच्या गॅस टाक्या, 3 हजार 100 रूपये किंमतीच्या एपी गॅस कंपनीच्या अर्धवट भरलेल्या टाक्या, 5 हजार 500 रूपये किंमतीचा इलेक्ट्रॉक्सिन वजनकाटा, 18 हजाराचे प्रेशर पंप, 70 हजाराची रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गोपीचंद सुनील आरडे याच्याविरूध्द भादंवि कलम 1860 चे कलम 285, 286, 336 तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील कलम 3,7,8 मधील तरतुदीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com