पाईपलाईन फोडून मनपाचे 13 लाखांचे नुकसान

गॅस पाईपलाईन ठेकेदाराविरूध्द गुन्हा
पाईपलाईन फोडून मनपाचे 13 लाखांचे नुकसान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गॅस पाईपलाईनचे (Gas Pipeline) काम करणार्‍या ठेकेदार (Contractor) कंपनीने नगर शहरासाठीची पिण्याची पाईपलाईन (Drinking Pipeline) फोडून महापालिकेचे (Municipal Corporation) 13 लाख 55 हजारांचे नुकसान (Loss) केल्याने महापालिकेने (Municipal Corporation) पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी संबंधित ठेकेदाराविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

पाईपलाईन फोडून मनपाचे 13 लाखांचे नुकसान
वर्क ऑर्डर काढा मग बुलडोजर चालवा

याप्रकरणी मनपा पाणीपुरवठा विभागातील अभियंता प्रदीप ढगे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गॅस पाईपलाईनचे काम करणार्‍या पुष्पा इन्फ्रा कंपनीचे मालक श्रीकांत शुक्रे (रा. वांबोरी, ता. राहुरी) व त्यांचे पोकलेनवरील चालक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

पाईपलाईन फोडून मनपाचे 13 लाखांचे नुकसान
शिक्षक बँकेवर ‘गुरूमाऊली’च्या तांबे गटाचा झेंडा

या कंपनीच्या अधिकारी-कर्मचार्‍यांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अनेकवेळा काम करताना खबरदारी घेण्याचा सूचना दिल्या होत्या. तरीही या कंपनीच्या कर्मचार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत मनमानी पद्धतीने कामकाज सुरूच ठेवले. मंगळवारी (दि. 11) सायंकाळच्या सुमारास विळद गावाजवळील मुख्य जलवाहिनीचा एअरवॉल ठेकेदार कंपनीच्या पोकलेनमुळे तुटला. तसेच पाईपलाईनही फुटली. त्यामुळे सुमारे 87 लाख लीटर पाणी वाया गेले. या जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी महापालिकेला तब्बल 50 हजार रूपयांचा खर्च करावा लागला.

पाईपलाईन फोडून मनपाचे 13 लाखांचे नुकसान
100 रुपयात रवा, डाळ, साखर, तेल शिधा रेशन दुकानात पोहोचलाच नाही !

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com