गॅस पाईपलाईनसाठी सरस्वती नदीत खोदकाम

नैसर्गिक प्रवाहास अडथळा, नागरिकांचा विरोध
गॅस पाईपलाईनसाठी सरस्वती नदीत खोदकाम

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा शहरातुन गॅस पाईपलाईन नेत असताना सरस्वती नदीच्या प्रवाहाला आडवे खोदकाम करून पुलाच्या खाली नदी पात्रात चर घेऊन ही पाईपलाईन नेली जात आहे. यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण होणार असल्याचे सांगत नागरीकांना यास विरोध केला आहे.

तालुक्यातील लिंपणगाव मधील रिलायन्स गॅस कंपनी पासून औरंगाबाद च्या दिशेने जाणार्‍या भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड कंपनीच्या सीएनजी गॅस पाईपलाईन चे काम अनेक ठिकाणी ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे चालू आहे. हे गॅस पाईपलाईन चे काम अर्धेअधिक होत आले आहे. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांच्या शेताच्याकडेने जाताना अनेक ठिकाणी शासकीय अधिकारी यांना हाताशी धरून दंडेलशाहीने हे पाईपलाईन चे काम सुरू आहे. श्रीगोंदा शहरातील अडथळ्यांची शर्यत पार करताना कोटीच्या, नागरीकांना नुकसान भरपाईपोटी कोट्यवधी रूपये द्यावे लागणार असल्याने हे काम शहराजवळ रखडले आहे.

मात्र कोळगाव पासून कोथुळ, ढोरजा, भानगाव, देउळगाव, घुगलवडगाव, या गावच्या हद्दीत रस्त्याचे वाटोळे करत मनमानी पद्धतीने शेतकर्‍यांचा विरोध मातीत घालत या ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेने काम उरकले आहे. शेतकर्‍यांच्या शेतात काम करताना शेतकर्‍यांना काहीही नुकसान भरपाई दिली नसल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. हे काम शहराच्या हद्दीत होत असताना महसूल विभाग,श्रीगोंदा पालिका ,बांधकाम विभाग,वन विभाग या कांमाच्या परवानग्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरीकांचे आरोप आहेत.

शहरातील सरस्वती नदीच्या पात्रात सध्या या गॅस पाईपलाईन चे कामासाठी खोदकाम करण्यात आले असून नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हे खोदकाम करण्यात आले आहे. कुठल्याही नदी पात्रात खोदकाम करताना नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्‍हास होणार नाही याबाबतीत नियमावली असताना अशी नियमावली पायाखाली तुडवत संबंधित ठेकेदाराने नदीत उभे खोदकाम केले असल्याने नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळे निर्माण होणार आहेत. याबाबत नागरीकांची आरेड होत असताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.

पालिकेचेे ठेकेदारासाठी रेडकार्पेट

संबंधित गॅस पाईपलाईन चे काम शहरातून जात असताना श्रीगोंदा पालिकेची भूमिका महत्त्वाची आहे. असे असताना श्रीगोंदा पालिकेने नागरीकांचे होणारे नुकसान, महापालिकेच्या रस्ते तसेच साधन संपत्तीचे नुकसान, नागरीकांची गैरसोय साकडे दुर्लक्ष करत गॅस कंपनीचे काम पूर्ण करून देण्यासाठी रेट कार्पेट टकाले आहे. अर्थात यामागे मोठे अर्थकारण असल्याची चर्चा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com