गॅस सिलेंडरच्या भडक्यात होरपळून एकाचा दुर्दैवी मृत्यू

गॅस सिलेंडरच्या भडक्यात होरपळून एकाचा दुर्दैवी मृत्यू

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

वैजापूर (Vaijapur) तालुक्यातील महालगाव (Mahalgav) येथे गॅस सिलेंडरने (Gas Cylinder) पेट घेतल्याने भडक्यात होरपळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. किसन रामभाऊ सपकाळ (वय 60) असे या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार महालगाव (Mahalgav) येथील किसन सपकाळ हे आपल्या घरी एकटे असताना त्यांच्या घरातील गॅस सिलेंडर लिंक झाला. लीक झालेला गॅस (Gas) ज्वलंत पदार्थाच्या संपर्कात आल्याने घरात मोठा भडका झाला.आग लागल्यावर गावातील नागरिकांनी आग (Fire) विझविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी गस्तीवर असलेल्या वीरगाव पोलिसांनीही (Virgav Police) आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आग विझल्यानंतर त्यांना सपकाळ भाजलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेत सर्व संसार उपयोगी साधने जळून खाक झाली.

याप्रकरणी वीरगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार थोरात करीत आहेत. किसन सपकाळ यांच्या पश्चात पत्नी, भाऊ व भावजई असा परिवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com