घरगुती ते कमर्शिअल गॅसचा झोल

घरगुती ते कमर्शिअल गॅसचा झोल

लाखोंच्या मुद्देमालासह एकास अटक || नगर तालुका पोलिसांची कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वेगवेगळ्या गॅस कंपनीच्या (Gas Company) कमर्शिअल सिलेंडरमध्ये (Commercial cylinder) घरगुती वापराच्या सिलेंडरमधून (Cylinder for Domestic Use) गॅस भरून बनावट लेबल लावून ग्राहकांची फसवणूक (Coustmer Fraud) करणार्‍या रिफिलिंग सेंटरवर (Refilling Center) नगर तालुका पोलिसांनी छापा (Police Raid) टाकला. 2 लाख 80 हजारांचे साहित्य जप्त (Seized) करून एकाला अटक (Arrested) केली आहे. नगर तालुका पोलिसांनी नगर तालुक्यातील वडगाव तांदळी (Vadgav Tandali) येथे ही कारवाई केली.

पोलिसांनी कारवाईत (Police Action) 42 कमर्शिअल सिलेंडर, घरगुती वापराचे 5 सिलेंडर, गॅस भरण्याचे साहित्य, एक पिकअप टेम्पो असा दोन लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात (Accused Arrested) घेतले. नगर तालुक्यातील (Nagar Taluka) वडगाव तांदळी (Vadgav Tandali) येथे एकजण घरगुती गॅस सिलेंडरमधून (Domestic Gas Cylinder) व्यवसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून नगर तालुका पोलिसांनी वडगाव तांदळी येथील केसरी फिल्म सेंटरवर छापा (Raid on Kesari Film Center) टाकला. या कारवाईत अशोक रघुनाथ घाडगे राहणार वडगाव तांदळी याने कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता गॅस रिफिलींग करत असल्याचे आढळून आले.

फिलींग सेंटर चालवणार्‍या अशोक रघुनाथ घाडगे राहणार वडगाव तांदळी यास अटक केली. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी सहाय्यक फौजदार भास्कर लबडे यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 286 336 जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 1955 चे कलम 37 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली पुढील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करीत आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil), अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल (Additional Superintendent of Police Saurabh Agarwal) पोलीस विभागीय अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सहाय्यक फौजदार भास्कर लबडे, सहायक फौजदार इथापे, पोलीस नाईक दहिफळे, महिला पोलीस नाईक धनवडे, पोलीस कॉन्स्टेबल घावटे यांनी कारवाई केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com