गर्दनीच्या मडके खून प्रकरणी दोघांना अटक

गर्दनीच्या मडके खून प्रकरणी दोघांना अटक

अकोले |प्रतिनिधी| Akole

जुलैमध्ये कोंबड्या चोरण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केल्याचा राग मनात धरून गर्दनीच्या दशरथ नारायण मडके याचा खून केल्याप्रकरणी देवजी देवराम खोडके व कावजी संतू मेंगाळ या दोघांना अकोले पोलिसांनी गजाआड केले आहे.

गर्दणी येथे देवजी देवराम खोडके याने जुलै महिन्यात कोंबड्या चोरून नेण्याचा प्रयत्न केला असता दशरथ मडके यांनी गर्दनी गावचे सरपंच यांना माहिती दिल्याचा राग मनात धरून आरोपी देवजी खोडके याने आरोपी कावजी मेंगाळ यास मदतीला घेऊन दशरथ मडके यांना बाजरीचे दाणे काढून झाल्यानंतर सोबत घेऊन अकोले येथे दारू विकत घेऊन प्रवरा नदी पात्राच्या छोट्या पुलावर दारू पीत असताना आरोपी देवजी देवराम खोडके व कावजी संतू मेंगाळ या दोघांनी दशरथ मडके याला पाण्यात ढकलून देऊन जीवे ठार मारले आहे.

अशी फिर्याद मडकेची पत्नी अनुसया दशरथ मडके (वय 32, रा. गर्दणी) यांनी अकोले पोलिसांत दिल्यावरुन अकोले पोलिसांनी दोघांच्या विरोधात भादंवि कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल असून आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे करत आहेत.

Related Stories

No stories found.