गर्भगिरीत बेकायदा वृक्षतोड

वन विभागाचे दुर्लक्ष : निसर्गप्रेमी संतापले
गर्भगिरीत बेकायदा वृक्षतोड

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्याला वरदान लाभलेल्या गर्भगिरीच्या डोंगरातील हजारो वृक्षांची बेकायदेशीर वृक्षतोड होत असून याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने निसर्गप्रेमी संतापले आहेत. दोषीवर कारवाई न झाल्यास आंदोलनाच्या पवित्र्यात ते आहेत.

शहरातील सुवर्णयुग तरुण मंडळ, लायन्स क्लब, दोस्ती तरुण मंडळ यांच्यासह अनेक निसर्गप्रेमी निसर्ग संवर्धनासाठी अथक परिश्रम करत आहेत. वृक्षप्रेमींनी उन्हाळ्यात पाणी घालून शहराजवळील वनविभागाच्या हद्दीतील वनदेव डोंगर व परिसरातील अनेक झाडे जगवली आहेत. केळवंडी, चेकेवाडी या परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी कडूनिंब, बाभूळ, जांभूळ, दाबुर्डा, हेकळ, सीताफळ, खैर, भोकर, करवंद यासह विविध वनौषधींच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करून मोठमोठे ढिगारे लावले आहेत.

प्रचंड वृक्षतोडीमुळे विविध वनौषधीमुळे गर्भगिरी डोंगर लवकरच ओसाड माळरान होऊ शकतो.तालुक्यातील श्रीक्षेत्र वृध्देश्वर, श्रीक्षेत्र मढी, श्रीक्षेत्र मायंबा, श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानाबरोबर निसर्गरम्य गर्भगिरी डोंगर रांगांमुळे पाथर्डी तालुका पर्यटकांना खुणावतआहे. वृक्षतोडीमुळे डोंगर परिसर ओसाड होऊन त्याचा पर्यटनावर परिणाम होऊ शकतो.वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने निसर्गप्रेमी मधून तीव्र संताप व्यक्त होत असून दोषीवर कारवाई करावी यासाठी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com