कचरागाडीची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

सक्कर चौक ते आयुर्वेद रस्त्यावरील घटना
कचरागाडीची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील कचर्‍याची वाहतूक (Transportation of Garbage) करणार्‍या महापालिकेच्या (Municipal Corporation) वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत (Bike Accident) दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. गुरूवारी सकाळी सक्कर चौक (Sakkar Chowk) ते आयुर्वेद कॉलेज रस्त्यावर (Ayurveda College Road) ही घटना घडली. अशोक शिंदे (वय 40 रा. वाळुंज ता. नगर) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

कचरागाडीची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू
श्रीरामपूर येथील रेल्वे भुयारी पुलाजवळ टँकरचा अ‍ॅक्सल तुटला

शहरातील सक्कर चौक ते कोठला परिसर या दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाच्या कामास वाहतुकीचा अडथळा होत असल्याने सक्कर चौकातून टिळक रोडकडे वाहतूक वळविण्यात आली आहे. या रस्त्यावर सक्कर चौकाजवळ कचर्‍याची वाहतूक करणार्‍या गाडीने दुचाकीस्वाराला धडक (Bike Hit) दिली. या धडकेत दुचाकीस्वार अशोक शिंदे मयत झाले आहेत. मयत शिंदे होमगार्ड असल्याची माहिती समजली आहे.

कचरागाडीची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू
पाणलोटातील पाऊस ओसरला

याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, उड्डाणपूलाच्या कामासाठी या रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र अवजड वाहनेही याच रस्त्यावरून जात असल्याने रोजच छोटे-मोठे अपघात होत आहेत. तेथील वाहतुकीच्या नियोजनाबाबत पोलीस प्रशासनाने नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

कचरागाडीची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू
अखेर प्रवरा नदीत कोसळलेले वाहन पाण्याबाहेर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com