नगर-पुणे महामार्गावर कचर्‍याचे ढिगारे

नगर-पुणे महामार्गावर कचर्‍याचे ढिगारे

सुपा (वार्ताहर) -

अहमदनगर पुणे महामार्गावर ठिकठिकाणी कचराडेपो झाले आहेत. महामार्गावर कचर्‍यापासून-खराब

केमिकल पर्यंत तर औद्योगिक कचर्‍यापासून- ई कचर्‍यापर्यंत सर्वच टाकाऊ मटेरियल टाकून दिले जाते.

नगर-पुणे महामार्गावरील नगर-शिरूर दरम्यान सर्वच ठिकाणी हॉटेल व्यावसायिक, मटन व्यावसायिक, औद्योगिक वसाहतीचे टाकाऊ मट्रेल व काही केमिकल कंपन्यातील टाकाऊ केमिकल रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेने टाकून दिले जाते. यात महामार्गावर काही ठिकाणी म्हणजे सुपा कामरगावच्या सिमेवर सुपा पवारवाडी घाटात सुपा टोलनाका परीसरात. जातेगाव घाट व बेलवंडीफाटा गव्हानवाडी या ठराविक ठिकाणी तर डंपिंग ग्राऊंड असल्याप्रमाणे कुणीही येतात आणि कचरा टाकून जातात.

यांना ना कुणाचा धाक ना कुणाची भीती ही सर्वच ठिकाणे दोन गावांच्या सिमावरती असल्याने कुणीही ग्रामस्थ यांना अटकाव करत नाही. सुपा कामरगाव हद्दीच्या सिमेवर मासे, मांसवाले टाकाऊ मटेरियल टाकतात तर पवारवाडी घाट व जातेगाव घाटात नेहमीच खराब केमिकलचे टँकर खाली केले जातात. या दोन्ही ठिकाणी वन क्षेत्र असल्याने जंगली प्राणी आहे. कित्येक वेळा या जंगली प्राण्यांनी पाणी समजून रात्रीच्या अंधारात जीव गमावला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com