कचरा संकलनाच्या ठेक्याची सात वर्षांपर्यंत वाढवलेली मुदत रद्द

कचरा संकलनाच्या ठेक्याची सात वर्षांपर्यंत वाढवलेली मुदत रद्द

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेकडून नव्याने नियुक्त केल्या जाणार्‍या कचरा संकलन व वाहतूक ठेकेदाराला आता तीन वर्षांचाच कालावधी मिळणार आहे. महापालिका आयुक्तांनी सात वर्षांपर्यंत वाढवलेली ठेक्याची मुदत रद्द करून, ती पुन्हा तीन वर्षांवर आणली आहे. ठेकेदाराचे काम पाहून जास्तीत जास्त आणखी दोन वर्षे मुदतवाढ देता येईल अशी तरतूद त्यांनी केली आहे.

शहरातील कचरा संकलन व वाहतुकीसाठी महापालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती केली जाते. सध्याच्या ठेकेदाराची मुदत संपुष्टात येत असल्याने मनपाने नव्याने निविदा प्रसिद्ध केलेली आहे. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची मुदत संपण्याच्या दोन दिवस आधीच महापालिकेत ठेकेदार संस्थांची निविदापूर्व बैठक पार पडली.

यात ठेक्याची मुदत तीन वर्षांऐवजी सात वर्षे करावी, अशी मागणी ठेकेदारांकडून करण्यात आली होती. महापालिका प्रशासनानेही ठेकेदारांच्या या मागणीला प्रतिसाद देत ठेक्याची मुदत सात वर्षांपर्यंत वाढवली होती. यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. दुसर्‍याच दिवशी मनपा प्रशासनाने ठेक्याची मुदत वाढवण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com