
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
घरासमोर कचरा (Garbage) टाकू नका, असे म्हणत माय-लेकाला मारहाण (Beating) केल्याची घटना सिध्दार्थनगरच्या म्युनसिपल कॉलनीत घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दोघांविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. अंजली सुनील कुलकर्णी (वय 39 रा. सिध्दार्थनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल (Filed a Crime) झालेल्यांमध्ये मच्छिंद्र गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही) आणि सचिन मच्छिंद्र गायकवाड (दोघे रा. सिध्दार्थनगर) यांचा समावेश आहे. 20 जून रोजी रात्री फिर्यादी व त्यांचा मुलगा घरी असताना मच्छिंद्र व सचिन फिर्यादी यांच्या घरासमोर आले व म्हणाले,‘तुम्ही तुमच्या घरातील केर कचरा (Garbage) टाकायचा नाही, निट नेटके राहायचे’, तेव्हा फिर्यादी त्यांना म्हणाल्या,‘आम्ही तुमच्या घरासमोर कचरा (Garbage) टाकत नाही’, असे म्हणताच मच्छिंद्र व सचिन यांनी फिर्यादीसह त्यांच्या मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केली आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.