Photo : आली गौराई अंगणी...

घरो घरी गौरी गणपतीचे उत्साहात स्वागत
Photo : आली गौराई अंगणी...

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरोघरी गणपती विराजमान झाले आहेत. गणपतीच्या उत्साहानंतर आज गौराईंचा आवाहन सोहळा आहे. शहरात देखील मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने गौराईंचे आगमन झाले आहे. अनेक घरात विधिवत पूजन करून गौरीची स्थापना केली जात असून, गौरी स्थापना केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी लाभत असल्याची अनेक भाविकांची श्रद्धा आहे. याच पार्श्वभूमीवर सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने रांगोळी, फुलांची आकर्षक सजावट करत गौरीचे आगमन झाले. यावेळी पुरणपोळीचा नैवेद्य गौराईला दाखवून आरती करण्यात आली.

घरोघरी पारंपारिक पध्दतीने आणि सोनपावलांनी गौरींचे आगमन झाले आहे. घरातील कुटुंबातील सर्व लहान, थोर या उत्सवात सहभागी होतात. महिला अगदी नटून सजून गौरींचे स्वागत करत असतात. तीन दिवस या उत्सवामुळे घरात आनंदाचे वातावरण राहते, आपल्या संस्कृतीत गौरी गणपती सणाला मोठे महत्त्व आहे. हा सण सर्वजण एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात या सणाला पारंपारिक महत्त्व आहे. ज्येष्ठाच्या नक्षत्रावर महालक्ष्मीचे पूजन केले जाते. रांगोळीने अंगणात सजावट केली जाते, तुळशीचे पूजन करून गौरीचे घरामध्ये आगमन करून स्थापना केली जाते. गौरी आपल्याकडे माहेरवासीन आल्याने आपल्याकडे त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या, मिठाई, फळे आधी सर्व नैवेद्य दाखविले जाते.

- किरण शिंदे व परिवार, एकविरा चौक, पाईपलाईन रोड, अहमदनगर

- जयश्री शैलेंद्र कांबळे, पाईपलाईन रोड अहमदनगर

- रेणुका अनिरुद्ध मुळे, पाईपलाईन रोड अहमदनगर

- वैशाली व सुरेखा टेंभूरकर, सावेडी, अ.नगर

- शीतल भुतडा, श्रीरामपूर

- सौ. सारिका विशाल सिद्ध, अहमदनगर

- सौ. भाग्यश्री वेद कुलकर्णी, सिव्हिल हडको, अहमदनगर

- सौ. शोभा व श्री. बबन गायकवाड, पाईपलाईन हडको, अहमदनगर

- जयश्री गिरी, साईराज नगर अहमदनगर

- माधुरी लासुरकर, आगरकर मळा अहमदनगर

- वर्षा पाठक आनंद नगर अहमदनगर

- जयश्री बारटक्के, केडगाव अहमदनगर

- दिपाली काळे, देहरे (ता. नगर)

- दैवशाला डोके, पाईपलाईन रोड अहमदनगर

- जयश्री ढवळे, गांधीनगर अहमदनगर

- प्राजंली जोशी, भुतकरवाडी अहमदनगर

- सावित्राबाई लोंढे, बालिकाश्रम रोड अहमदनगर

- आश्विनी मयुर गायकवाड, कोपरगाव जि. अ.नगर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com