महाराज मंडळी अन् बेटावरच्या विद्यार्थी यांच्यातच होणार सप्ताह
सार्वमत

महाराज मंडळी अन् बेटावरच्या विद्यार्थी यांच्यातच होणार सप्ताह

Arvind Arkhade

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

सद्गुरू योगिराज गंगागिरी महाराज 173 वा अखंड हरिनाम सप्ताह साध्या पध्दतीने साजरा होणार आहे. महाराज मंडळी आणि बेटावरील विद्यार्थी यांच्या उपस्थितीत 24 ते 31 जुलै असा हा सप्ताह सराला बेटावर संपन्न होणार आहे.

पहिल्याच दिवशी सकाळी 10 वाजता प्रहरा सुरू होणार आहे. त्यानंतर प्रवचन 1 ते 2 वाजता होणार आहे. प्रहरा हा बेटावरील सभा मंडपात होणार आहे. त्यात अवघे 10 विद्यार्थी भजन म्हणणार आहेत. असे 24 तासांत चार गट करण्यात आले आहेत.

प्रवचन ऑनलाईन

महंत रामगिरी महाराज सप्ताह काळात दुपारी 1 ते 2 या वेळेत प्रवचन करणार आहेत. त्यांच्या या प्रवचनाचा आस्वाद भाविकांना ऑनलाईन घेता येणार आहे.

पत्रकारांनाही प्रवेश नाही !

बेटावर उत्तरेकडून तसेच पश्चिमेकडून येणारे रस्ते बंद करण्यात येणार आहेत. यामुळे बाहेरील कुणालाही बेटावर सप्ताहासाठी येता येणार नाही. पत्रकारांना लिंक पाठविण्यासाठीची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय राजकीय मंडळी, नेते, पुढारी यांनाही बेटावर येता येणार नाही.

बेटाकडे येणारे सर्व रस्ते 24 ते 31 जुलै दरम्यान बंद करण्यात येणार आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर या अखंड सप्ताहाची परंपरा कायम राहणार असली तरी आमटी भाकरी, प्रवचनाला लाखोंची गर्दी, एकादशीच्या किर्तनाला आणि सांगतेला होणारी 8 ते 10 लाखांची गर्दी आणि विशेष म्हणजे जे कायम सप्ताहाला येतात त्यांना मात्र यावेळी घरीच भजन आणि सोशल मीडियावर अथवा वृत्तपत्रातून बातम्यांच्या स्वरुपात प्रवचनातील मार्गदर्शनाचा आनंद घेता येईल.

Deshdoot
www.deshdoot.com