
कर्जत (वार्ताहर) -
तालुक्यातील सिद्धटेकनजीकच्या वडारवस्ती येथील हृषिकेश परशुराम सुर्यवंशी यांना घराजवळ पहाटेच्या वेळी काहीतरी पडल्याचा आवाज आला. घराबाहेर येऊन पाहिले तर लावलेली दुचाकी त्या ठिकाणी नव्हती. त्यांनी तात्काळ कर्जत पोलीस आणि नागरिकांशी संपर्क साधला.
स्थानिक नागरिक राजु लष्कर किशोर सांगळे, अमोल सांगळे, बाबुराव विटेकर, विजय तांदळे, दत्ता सांगळे, शहाजी पोटे, सचिन जाधव, महेश सांगळे, रोहित सांगळे, सखाराम तांदळे, अमोल भोसले तसेच पोलीस पाटील दादासाहेब भोसले यांनी संशयित आरोपींचा सिद्धटेक पेट्रोलपंपापर्यंत पाठलाग केला आणि त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान कर्जत पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. सुर्यवंशी यांची 40 हजार रुपये किमतीची, निळया रंगाची बजाज डिस्कव्हर मोटार सायकल (एम.एच. 45, आर.ओ. 881) ही चोरून घेऊन जात असताना चोरट्यांना पकडण्यात आले. त्यांनी त्यांची नावे आकाश विठ्ठल माने, वय 19 वर्ष, रा पोथरे, ता करमाळा, विठ्ठल सुभाष माने, वय 26 वर्ष, रा जेऊर, ता. करमाळा अशी सांगितली. पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव अमोल श्रीधर माने, रा. दिघोळ, ता. जामखेड असे असल्याचे सांगितले. कर्जत पोलिसांनी त्याचा माग काढून तांदुळवाडी, बारामती येथून अटक केली.
...................