टोळक्याच्या हल्ल्यात तिघे जखमी

सबजेल चौकातील घटना: तलवार, पाईप, दांडक्याचा वापर
टोळक्याच्या हल्ल्यात तिघे जखमी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

10 जणांच्या टोळक्याने हातामध्ये तलवार (Sword), लाकडी दांडके, लोखंडी पाईप (Iron Pipe), कबगीर घेत तिघांना मारहाण (Beating) केली. मंगळवारी सायंकाळी नगर शहरातील सबजेल चौकातील (Subjail Chowk) गौसपाक दर्गा येथे ही घटना घडली. मारहाणीत (Beating) राजु बाबुभाई शेख (वय 46 रा. जुनाबाजार, सबजेल चौक), राजु शेख यांचा नातु मोईन समीर शेख व पुतण्या अरबाज आयुब शेख जखमी (Injured) झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात (District Hospital) उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी राजु शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. आरोपीमध्ये हैदर दौलाभाई, छोटुभाई, राजुभाई, बंटी राजुभाई, अरबाज सय्यद गफूर, अनिस अर्शद, अजिम अर्शद, नसिर रब्बानी, वसीम लतीफ, आतीक इस्माईल कुरेशी (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. सबजेल चौक) यांचा समावेश आहे. राजु शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व माझा नातू मोईन शेख उरूस कामी गौसपाक दर्गा येथे चादर टाकण्यासाठी गेलो असता वरील 10 आरोपींनी तलवार, लाकडी दांडके, लोखंडी पाईप व भात हलवण्याचे लोखंडी कबगीर घेवुन मारहाण (Beating) करत गंभीर दुखापत केली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संपत शिंदे (PI Sampat Shinde), उपनिरीक्षक इंगळे यांनी भेट दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक दुर्गे करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com