खंडणी घेताना श्रीरामपुरात टोळी रंगेहाथ जेरबंद

वन अधिकारी फिर्यादी, श्रीरामपूर, लोणी खुर्दचे आरोपी
खंडणी घेताना श्रीरामपुरात टोळी रंगेहाथ जेरबंद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

वन अधिकार्‍याकडून (forest officer) 1 लाख 20 हजार रुपयांची खंडणी (ransom) स्विकारताना खंडणी बहाद्दर टोळीला रंगेहाथ पकडल्याची (Arrested) घटना श्रीरामपूर (Shrirampur) शहरात काल मंगळवारी सायंकाळी घडली. ही कारवाई लोणी पोलिसांनी (Loni Police) पार पाडली.

श्रीरामपुरातील 9Shrirampur) हुसेन दादाभाई शेख याने दि. 19 जुलै रोजी राहाता विभागातील वनरक्षक (Forester in Rahata Division) संजय मोहनसिंग बेडवाल यांना फोन करून तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत वकिलामार्फत हायकोर्टात (HighCourt) जाणार आहे तसेच तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत मला सर्व माहिती असून 25 लाखांची खंडणीची मागणी केली. तडजोडीअंती 12 लाखांची करत ती दिली नाही तर हातपाय तोडून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

20 जुलै रोजी 2 लाख रुपयांची खंडणी घेऊन ये असे धमकावले. याबाबतची माहिती वनरक्षक बेडवाल, वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय अधिकारी संजय सातव यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळ्याचे नियोजन करण्यात आले.

ठरल्याप्रमाणे लोणी पोलीस स्टेशनचे पथक, वनरक्षक बेडवाल व दोन पंच असे खाजगी वाहनाने लोणीहून श्रीरामपुरातील वॉर्ड नं. 1, साई व्हिला रूम नं. 33 येथे राहणार्‍या हुसेन दादाभाई शेख याच्या घरी आले. पोलिसांनी बेडवाल यांना मागणी प्रमाणे सापळ्यातील रक्कम 1 लाख 20 हजार रूपयांची रक्कम देऊन घरात पाठविले.

तेथे अनिल गोपीनाथ आढाव (रा. विरोबा लवनरोड, लोणी खुर्द, ता. राहाता) सलीम बाबामियॉ सय्यद (रा माळहिवरा, गेवराई) यांनी स्वीकारल्याने सापळ्यातील नियोजनाप्रमाणे त्यांना रोख रक्कम 1 लाख 20 हजार रूपये रोख रक्कमेसह पंचासमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात येऊन या तिघांना जरबंद केले.

वनरक्षक बेडवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा र.नं. 305/ 2021 नुसार भादंवि 120 (ब), 387, 385, 384, 379, 506, 507 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सपोनि समाधान पाटील, पोना संपत जायभाये, दीपक रोकडे, पोकाँ मच्छिंद्र इंगळे, सोमनाथ वडणे, मपोना सविता भांगरे यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com