गणेश कारखाना प्रतिटन 50 रुपये जादा दर देणार - विवेक कोल्हे

गणेश कारखाना प्रतिटन 50 रुपये जादा दर देणार - विवेक कोल्हे

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

गणेश कारखाना तालुक्यातील कारखान्यापेक्षा किमान 50 रुपये प्रतिटन ज्यादा भाव देईल, गणेशच्या कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांनी इतर कारखान्यांना ऊस न देता गणेशला ऊस द्यावा असे आवाहन युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.

पुणतांबा येथील बलराज धनवटे यांच्या वस्तीवर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी गणेशाचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते यांचेसह सर्व संचालक मंडळ, गंगाधर चौधरी, शिवसेनेवचे सुहास वहाडणे, भाऊसाहेब चौधरी, धनजंय जाधव, गंगाधर धनवटे, सोपान धनवटे, सुधाकर जाधव, संभाजी गमे, दादा सांबारे, नितीन सांबारे, भाऊसाहेब गमे, शिवाजी गमे, नाना गव्हाणे, रामभाऊ जाधव, संजय जाधव, बाळासाहेब जाधव, बी एस पाटील, ज्ञानेश्वर धनवटे, दिपक डोखे, चंद्रकांत डोखे, एकनाथ तळेकर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विवेक कोल्हे म्हणाले, गणेश कारखाना सुरु करण्यासाठी किमान सव्वा तीन लाख टन ऊसाची गरज आहे. सध्या 1 लाख टन उसाची नोंदणी झाली आहे. पुणतांबा कार्यक्षेत्रातून संजीवनी कारखान्याला येणारा ऊस यंदा संजीवनीला न देता शेतकर्‍यांनी तो गणेशला द्यावा. तसेच जे शेतकरी इतर कारखान्याला ऊस देत होते त्यांनी ऊस गणेश कारखान्याला द्यावा. गणेश कारखाना तालुक्यातील कारखान्यापेक्षा किमान 50 रुपये प्रतिटन ज्यादा भाव देईल. सभासदांनी विश्वास टाकून कारखान्याची सूत्रे आमच्या कडे सोपविली आहेत. त्यामुळे आम्ही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सध्या ऊस लागवडीसाठी कार्य क्षेत्रात मोहिम हाती घेण्याची गरज आहे. प्रत्येक संचालकाने प्रत्येक गटात किमान 150 एकर क्षेत्रात उसाची लागवड होण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

तसेच कार्यक्षेत्रा बाहेरील असलेले नातेवाईक मित्रमंडळी यांचा ऊस गणेशला मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारखान्या समोर अनेक अडचणी आहेत. त्या अडचणीवर मात करण्यासाठी संचालक मंडळ मात करणार आहोत पण कारखाना सुरु करण्यासाठी जास्तीत जास्त ऊस उपलबध झाला पाहिजे. कारखान्याचा निवडणूक निकाल जाहिर झाल्यानंतर आम्ही कारखान्याची मालमत्ता, साखरेचा साठा, मोलॅसिस, भंगार याबाबद माहिती घेतली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत. तसेच सध्या कारखान्याचा पेट्रोल पंप सुरु करावा अशी सभासदांची मागणी आहे.

मात्र ज्या खाजगी व्यक्तीने पेट्रोल पंप चालविण्यासाठी घेतला होता त्याने अंदाजे 18 लाखाचा अद्याप भरणा केलेला नाही. गणेश कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील काही गावातील गणेशाची ऑफीसेस बंद करून तेथे दुसर्‍या कारखान्याची ऑफीसेस सुरु झालेली आहे. ती बंद करून तेथे पुन्हा गणेश कारखान्याची ऑफीसेस सुरु करून ऊस वाढीसाठी व मिळविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. यापुढे आमचे सत्कार करण्यापेक्षा ऊस लावा इतरांकड्न ऊस मिळवा व गणेशला पुन्हा वैभवशाली दिवस आणण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. याचा त्यांनी आर्वजून उल्लेख केला. यावेळी संचालक संपतराव चौधरी यांनी ही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सर्जेराव जाधव तर बलराज धनवटे यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com