‘गणेश’च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची उद्या निवड

‘गणेश’च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची उद्या निवड

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या पदाधिकारी निवडीसाठी उद्या बुधवार दि. 28 जून रोजी नूतन संचालक मंडळाची बैठक होत आहे.

श्रीगणेश कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी महसुलमंत्री आ. बाळासाहेब थोरात व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळाने 19 पैकी 18 जागा जिंकत गणेशवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला ‘ब’ वर्गातील एक जागा मिळाली आहे.

आता कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बुधवार दि. 28 जून रोजी दुपारी 12 वाजता नूतन संचालक मंडळाची बैठक कारखान्याच्या कार्यस्थळावरील गुरुवर्य नारायणगिरी महाराज सभागृहात बोलविण्यात आली आहे.

गणेश कारखान्याच्या नूतन संचालक मडळापुढे कारखाना चालविणे, आर्थिक उपलब्धता करणे, उसाची पळवा-पळवी थांबविणे असे मोठे आव्हान आहे. गणेशच्या नूतन पदाधिकार्‍यांना चांगले काम करावे लागणार आहे. त्या दृष्टीने अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड संचालक मंडळाच्या बैठकीत ठरणार जरी असली तरी हा निर्णय माजी मंत्री बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांनाच घ्यावा लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com