विखे पाटलांनी प्रतिकूल परिस्थीतही गणेश चालविला

मुकूंदराव सदाफळ: गणेशच्या गाळपास प्रारंभ, 5 लाख टन गाळप करणार
विखे पाटलांनी प्रतिकूल परिस्थीतही गणेश चालविला

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने गणेश कारखाना चालू राहिला व यापुढेही चांगला चालेल. गणेश कारखाना या हंगामात 5 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करेल, असा विश्वास गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ यांनी व्यक्त केला.

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सन 22-23 या हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष मुकूदंराव सदाफळ, उपाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्याहस्ते विधिवत पुजा होऊन गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित समारंभात अध्यक्ष सदाफळ बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, संचालक अ‍ॅड. रघुनाथ बोठे, कार्यकारी संचालक अभिजीत भागडे, पानगव्हाणे, परजणे, डी. यु. खर्डे, पी. एम. विखे, कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, अदिंसह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.

गणेश कारखाना विखे पाटील यांच्या ताब्यात 2014 ला आला. तेव्हापासून दोन हंगाम वगळता कारखाना प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटे असतानाही त्यावर मात करून, उत्कृष्ठ नियोजन करून चांगला चालविला. एफआरपीप्रमाणे उसाला भाव दिला. कामगारांचे नियमित पगार केले. गणेश कारखान्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी उसाचे क्षेत्र कार्यक्षेत्रात वाढले पाहिजे. ना. विखे पाटील पाटपाण्याचे नियोजन चांगले करतील. त्यामुळे ऊस क्षेत्र वाढवा.

ना. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी गणेश चांगला चालावा म्हणून गणेश कारखान्यावर तज्ञ समिती बोलावून कोणते कोणते बदल कारखान्याच्या यंत्रात करावे, त्यानंतर आवश्यक तेथे नविन मशिनरी बसवून अद्ययावतपणा कारखान्यात आणण्यात आला आहे. कारखाना 1700 मेट्रीक टनावरून दैनंदिन 3500 मेट्रीक टन करण्यात आला आहे. गणेश कारखान्याचे सभासद, शेतकरी, व कामगार यांचे मोठे योगदान आहे.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक अ‍ॅड. रघुनाथ बोठे म्हणाले, गणेश ना. विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी चांगला चालविला आहे. विरोधकही विखे पाटलांनीच कारखाना चालवावा म्हणून आग्रही होते. विखे पाटलांनी गणेश चालविताना पदर मोडून कदर काढली. गणेश परिसराला न्याय दिला. या भागाशी त्यांची नाळ जोडली आहे. अनेक अडचणी असताना कारखाना सुस्थितीत आणला. कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर म्हणाले, हा हंगाम वेगळा आहे. संचालक मंडळ आणि कामगारांना कारखाना चालवायचा आहे. त्यामुळे काळजीने कारखाना चालवा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना या हंगामाचा चांगला रिझल्ट द्यावा, असेही ते म्हणाले.

याप्रंसंगी सेवानिवृत्त कामगार विजय वहाडणे यांचेही भाषण झाले. आभार संचालक अ‍ॅड. भाऊसाहेब शेळके यांनी मानले. याप्रसंगी संचालक सर्वश्री मधुकरराव कोते, अशोकराव दंडवते, सुदामराव सरोदे, विलासराव डांगे, सुर्यकांत निर्मळ, विजयराव गोर्डे, जे. आर. चोळके, अण्णासाहेब सदाफळ, नितीनराव गाढवे, विशालराव चव्हाण, जालिंदर निर्मळ, बाळासाहेब दाभाडे, पुरुषोत्तम गोरे, अ‍ॅड. शिवराम गाडेकर, राजेंद्र थोरात, राम कोते, अदिंसह सभासद, कामगार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com